बाप

घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा

बाप माझा राबराब राबला

टिचभर पोटासाठी

जीव त्यानं गहाण ठेवला

_________________

आवर्षणातला जन्म म्हणून

हालाकीतच जगला

टिचभर पोटासाठी

जीव त्यानं गहाण ठेवला.

_____________________

भल्या पहाटे उठून

रान गाठायचा

अनवाणी पायांनी

सगळं शिवार तुडवायचा…..

_________________

आयुष्यातल्या वादळानां

बाप माझा पुरून उरला

टिचभर पोटासाठी

जीव त्यानं गहाण ठेवला…..

_____________________

बाप तसा कर्माचा भिकारी

औदसा पाचवीला पुजलेली

दोन वेळच्या पोटासाठी

कायमचीच वणवण झालेली….

_________________________

बाप रात्रीचा दिवस करायचा

रक्ताच पाणी करून

पाच पोटं जगवायचा ….

___________________

बाप संसाराच्या गाड्याचं

भरभक्कम चाक होतं

सत्याच्या तराजूतलं

एक अचूक माप होतं….

_______________________

बाप आयुष्यभर

सत्याने वागला

पोटासाठी मात्र जीव

त्यानं गहाण ठेवला…..

______________________

एकदिवस पाप पुण्याचा

हिशोब झाला

जीवणाच्या रहाटगाडग्यात

बापाच्या जीवाचा लिलाव झाला….

_______________________

सरणावरची लाकडं रचता रचता

बापाचा निस्तेज चेहरा दिसला

काही कळलंच नाही

गहाण ठेवलेला बापाचा जीव विकत कुणी घेतला…

कवी- दिपक पाटील

Advertisements

नववर्ष हे आनंदाचे

भूतकाळातल्या आठवणी

आता पुसटश्या करूया

भविष्य काळाचा थोडा

कानोसा घेवूया…..

——————-

किती सरले दिवस

वर्षे किती सरले

दोन घडीचा डाव तुझा

हातात असे काय उरले….

————-

आले असेल वितूष्ट नात्यात जरी

मनाने जरा जवळ येऊया

एकमेकांच्या चुका शोधण्या पेक्षा

एकमेकांना समजून घेवूया……

—————

कितीही झालो आपण वयाने मोठे

मनाने जरा लहान होवूया

पुन्हा एकदा भातुकलीचा

खेळ मांडून पाहूया…..

——————-

आज जरी हरलो असलो

तरी उद्या जिंकणार आहे

मावळला असला सुर्य आज

तरी उद्या पुन्हा उगवणार आहे….

——————

कुडत कुडत जगण्या पेक्षा

हसत हसत जगायचं

भिंतीवरच्या दिनदर्शिकेची

पाने पालटत राहायचं……

———————–

दुस-याला दोष देण्यापेक्षा

स्वतःचा शोध घ्या

आकाशही कवेत येईल तुमच्या

येणार प्रत्येक क्षण जगूण घ्या…

__________________

ऋणानुबंधाचे नाते आपले

आणखीन घट्ट होवो

तुम्हा सर्वांना नविन वर्ष आनंदाचे

आणि आरोग्यदायी जावो…..

आपणा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

—– दिपक पाटील —–✍

पुन्हा जन्म घेशील का…

व्यसनेत गुरफटलेल्या आईची एक आर्थ हाक

—- —–

उदरात ज्यावेळी चाहूल

तुझी लागली

काय सांगू बाळा तुला

आनंदाने माझी झोप उडाली

—–

नऊ महीने कसी मी सोसले

तुझ्यासाठी किती हाल उपसले

वंशाचा दिवा येणार म्हणून

किती मी तुला जपले…

—–

तु ऊपजलास तो क्षण

सुवर्णमय होता

मुलगा झाला म्हणून घरी

आनंद साजरा होत होता…

—–

बाळ माझं गोंडस म्हणून

दृष्ट तुझी काढायची

काळा टीपका मी तुझ्या

गालावर लावायची….

—-

बाळा तुला काहीच

कळत नव्हतं तेव्हा

आईबाबा हेच

तुझं विश्व होतं….

——

तुझ्या बागडण्याने मन माझं

मोरावानी नाचायच

तु रांगताना अख्ख अंगंण

तुला अपुरं पडायचं….

—–

तुला साधा खोकला झाला

तरी झोप नाही लागायची

सगळी रात्र मी तुझ्या

उशाशी काढायची……

——

पडत झडत काळ पुढे

जात होता

तुझ्यासाठी माझं बोटच

तुझा एक आधार होता….

——

कळलंच नाही तु मोठा

कधी झालास अन

मित्रांच्यागराड्यात कधी

हरवून गेलास…..

—-

बारावीच्या रिझल्टची वेळ

जेव्हा आली

आनंदाच्या भरात मित्रांसोबत

तु ही थोडी घेतली….

—–

फक्त तुला निमित्त गावलं

आणि तुझ्या पार्ट्या होत गेल्या

माझ्या काळजाच्या मात्र

चिंध्या चिंध्या झाल्या….

——–

पेग वर पेग तुझे रिते होत गेले

दारू बरोबर

गुटखा सिगारेट तंबाखू नी

घर शरीरात केले….

——–

वाळवी लागावी तस

शरीर पोखरून निघाल

गोंडस बाळ माझं

मृत्यूशयेवर पडलं….

——

नवसाच पोर म्हणून खुप

तुला जपले

डोहाळे मला चागंलेच होते

तुझ्या संस्कारात कुठे

कमी पडले…..

— —

काय चुक झाली माझी

सांगशील का

माझ्याच उदरी

पुन्हा जन्म घेशील का…. ?

—- दिपक पाटील —

हात जोडूनी भजतो मी देवा तुला

हे विनायका सुफल होवु दे माझी कला

बुध्दीचे दान थोडे द्यावे तु मला

आशिर्वाद असो तुझा माझ्या कलेला..

—— ——-

मंद बुध्दी मी तुच विश्वाचा दाता

हात जोडतो तुला थोडे दान द्यावे आता

वंदुनी तुला आरंभ मी करतो

प्रारंभी मी तुलाच स्मरतो

—— ——

हे पहीले पुष्प मी तुझ्या चरणी वाहतो

काही चुकलं तर थोडी क्षमा मी मागतो

हे विघ्नहरा लंबोदरा कृपासिंधू तु

स्मरूनी तुला आरंभ मी करतो..

____ दिपक पाटील ___

थोडी घेतो……

कधी आनंद साजरा म्हणून

तर कधी मी दुःख गिळतो

वाईट मानून घेवू नका

मी थोडी घेतो……..

कधी पार्टी असते

तर कधी मैत्री खातीर

खुप आग्रह होतो

कारण मी थोडी घेतो….

पेग थर्टीचा असतो

चढत नाही नशा

म्हणून अनखी वाढवतो

कारण मी थोडी घेतो…….

कधी विस्की तर कधी रम असते

कधी जादा तर कधी कम असते

खिशाचं बजेट मी बघतो

कारण मी थोडी घेतो……….

अमल असा चढत जातो

धड मला मराठी जमत नाही

अन मी इग्लिश बोलू लागतो

कारण मी थोडी घेतो …….

घरी काही कळु नये म्हणून

मी सुपारी चगळतो

रस्ते कितीही चांगले असले

तरी माझा खड्यात पाय जातो

कारण मी थोडी घेतो…….

रात्रीची उतरत नाही

थोडा हँगओहर होतो

वाईट मानून घेवु नका

कारण मी थोडी घेतो……..

—— दिपक पाटील ——

अमावस्या

पोटशूळ नभात हे

अंनंत कळा सोसुनी

गर्द काळोख

चंद्रास गिळुनी…..

काळी बाहुली उलट्या नशिबाची

दृष्ट काढुनी ढुंगणाची

मांत्रीकाच्या गमती पाहुनी हशी

झाडावरचे व्यर्थ घुबड दोषी….

लिंबू मिरच्या बांदुनी गळा

मारूनी खिळा झाडावरती

अमावस्याची भुते

कित्येक फिरती……

कुठला देव पावला….

पावलो पावली मी देव बदलला

जाईल तिथे मी नवस बोलला

तुच सांग देवा मला

नेमका कुठला देव पावला….

कुणी म्हटलं कोंबड काप

कुणी म्हटलं बोकड काप

काळजावर मी दगड ठेवला

देवा तुच सांग मला कुठला देव पावला….

कुणी म्हटलं गावची देवी

कुणी म्हटलं नवशा मारुती

जाईल तिथे मी अंगारा घेतला

तुच सांग देवा मला कुठला देव पावला….

कुणी म्हटलं पैकं ठेव

कुणी म्हटलं कापूर ठेव

जाईल तिथे मी नारळ फोडला

तुच सांग देवा मला कुठला देव पावला….

कुणी म्हटलं फे-या मार

कुणी म्हटलं दंडवत घाल

देहाचा मी बुकणा केला

तुच सांग देवा मला कुठला देव पावला…….

कुणी म्हटलं डोगंर चढ

कुणी म्हटलं काशी कर

दगडाचा मी म्हसोबा केला

तुच सांग देवा मला कुठला देव पावला……

कुणी म्हटलं लिंबू टाक

कुणी म्हटलं उतारा टाक

कर्माचा मी भोपळा केला

तुच सांग देवा मला कुठला देव पावला……

तेहतीस कोटी जत्रेत देवा

बाजार तुझा असा रे कसा

दारी देवा तुझ्या टाहो मी फोडला

एकदा सांग तरी मला कुठला देव पावला……

कवी – दिपक पाटील

7620796297